श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी १९९० - ९१ इयत्ता दहावी बॅच साधारण पहिली वर्गापासून एकत्र असलेले बालमित्र दहावीच्या वर्गानंतर विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी गेले परंतु सण यात्रा उत्सव या निमित्ताने एकत्र येत असत,
यावेळी अनेकांनी सर्वांना गेट-टुगेदर करण्याची सूचना मांडली त्यानुसार येथील प्रगतशील शेतकरी माणिक पवार, कैलास कसार, संजय वळकुंटे यांनी संकल्पना मित्र संतोष कुदळे यांच्याकडे सुचवितास त्यांनी मा. ग्रामपंचायत सरपंच अविनाश पवार, गुरुदेव डॉ काटे स्वामीजी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले, उपसरपंच प्रदीप कसार, पत्रकार राजेंद्र देसाई, विश्वस्त बी.एन.पवार, सौ. मंजुषा मिसाळ यांच्याकडे मांडली सर्वानुमते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, मोबाईल, फेसबुक किंवा व्हाट्सअप या ऐवजी प्रत्यक्षात या स्नेहबंध अविस्मरणीय कार्यक्रमासाठी सर्व मित्र मैत्रिणी यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यामध्ये अनेक जण बालपणापासूनच शाळेत सोबत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेअरमन अनिरुद्ध महाले यांनी केले तर प्रास्ताविक संतोष कुदळे यांनी करत उपस्थित मित्र मैत्रिणी यांचा यावेळी जन्मदिवस देखील साजरा करण्यात आला.
यावेळी दिवंगत सुनील पवार, सुनील राऊत, अशोक उघडे, राजेंद्र पवार या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच यामध्ये विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी किंवा उच्च पदस्य यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रसंगी मंजुषा मिसाळ, स्वाती कडुस, विशाखा चक्रनारायण, कविता राऊत तसेच महसूल मंडल अधिकारी विजय चव्हाण, सुरेश जेठे, प्रकाश देवकर, लक्ष्मण राऊत, शिवाजी उदमले, हसराज पठाण, विजय उघडे,पत्रकार राजेन्द्र देसाई,माजी चेअरमन बापुसाहेब गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी मंदा लगे, सुनिता पवार, चंद्रकला भाकरे, अंजू शिंदे, मनीषा नवले, सुनिता जीवरख, रंजना उदमले,संगीता सिन्नरकर, किशोर पवार, राजेंद्र उघडे, प्रभाकर पवार, गजानन घायवट,अशोक फाळके, हरिभाऊ राऊत, गणेश पवार, संजय गाडे, बाळासाहेब कसार, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र जपे, नितीन पुंडेकर, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, रोहिदास भालेराव आदी या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते. संतोषसिंग परदेशी,आसाराम पवार तसेच सौ. अंजली शिंदे यांनी देशभक्तीपर गीते, भावगीते तसेच मैत्री या विषयावर गायन केले. स्नेह भोजन यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संयोजन समिती यांच्या वतीने उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी यांचा सन्मान करत आभार व्यक्त करण्यात आले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111