shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.                  
इंदापूर : आज 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे ध्वजारोहण तसेच संगीतमय कवायत व इतर अनेक कार्यक्रमाने भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
शाळा व्यवस्थापन समितीचे जेष्ठ सदस्य दयानंद  चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक नागरिक मान्यवर उपस्थित होते.
 ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत हे झाल्यानंतर देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मोरे मॅडम तसेच प्रतिभा गरकळ व शामसुंदर माने यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे श्री शामसुंदर माने यांनी आभार व्यक्त केले.
close