मोर्शी:- श्रीराम कॉलेज ऑफ नर्सिंग मोर्शी यांच्या सहभागाने उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली अंगदान जीवनदान उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घेतले. या अभियाना मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला व अवयव दान जनजागृती केली 15 ऑगस्ट 2025 या दिवशी कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रूग्णालय मोर्शी येथील डाॅ. श्री. पोतदार सर (वैद्यकीय अधिक्षक) श्रीमती वर्षाताई दारोकर (परिसेवीका) श्रीमती मिनाक्षीताई वगारे (परिसेवीका) श्रीमती सुमनताई जावरकर (परिसेवीका) कु. विशाखा ब्राह्मणे (अधिपरिचारीका) श्रीमती वैशालीताई घोगरे (सहाय्यक अधिक्षिका) कु. आचल तायवाडे (परिचारिका) श्री. विनयभाऊ शेलूरे ( आरोग्य सहाय्यक) श्री. प्रकाशभाऊ मंगळे (आरोग्य सहाय्यक) श्री. अंकीत नेवारे (अधिपरिचारीका) श्री. आनंद बूले श्री. मंगेभाऊ हूड, श्री. शिलेश शिंद्रे, श्रीमती विद्याताई गेडाम, श्री प्रशांतभाऊ बेहरे, श्री नंदूभाऊ थोरात, नौशाद शाहा व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्रीराम कॉलेज ऑफ नर्सिंग इंटरेस्टयुट चे संचालक राहुल धवळ आणि शिक्षक/शिक्षिका प्रशांत खामनेकर, संजना जावरकर, श्वेता नेवारे, पूजा देशमुख, पायल पारिसे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून घेतला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय तर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.