shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध आणी सुटका


ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण ७३ मुलींचा शोध

जावेद शेख/ राहुरी 
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर ८७६/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३६३ प्रमाणे दिनांक ११/०८/२०२३ रोजी  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परिश्रम घेवुन गुन्ह्यातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून  सदर पीडितेस  तिचे  नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.  व अपहरण करणारा युवक करण अशोक पवार वय २३ वर्ष रा. खुडसरगांव ता. राहुरी यास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.

तसेच ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन  गेल्या वर्षभरात ७३ मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे - पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाकचौरे - अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपूजे - उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे , मपोकॉ. वृषाली कुसळकर, अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close