मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आणि गौरवाचा आहे. मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व विद्यालयांतील गुणवंत विद्यार्थिनींचा आज आपण सन्मान करत आहोत.
हे केवळ पारितोषिकांचे वितरण नाही,तर एका मेहनती प्रवासाची, चिकाटीची आणि समर्पणाची पावती आहे.
कु.शेख फैजीन, खान तरन्नुमजहाँ, खान अफसाना, पठाण खतिजा आणि इतर सर्व विद्यार्थिनींनी आपल्या अथक मेहनतीने आणि जिद्दीने आज ही शिखरे गाठली आहेत. आजचा हा क्षण त्यांच्या परिश्रमांना सलाम करण्याचा आहे.
हे यश फक्त सुरुवात आहे. आयुष्याच्या स्पर्धेत अजून बरीच शिखरे तुम्हाला गाठायची आहेत. यासाठी स्वप्न मोठी ठेवा, पण त्यासाठीचा प्रयत्न अजून मोठा ठेवा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास आहे.
शिक्षक आणि पालकांचे योगदानही आज विसरून चालणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण हे यश साजरे करत आहोत असे प्रतिपादन मोहंमदीया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी चे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल, मुकुंदनगर, अहिल्यानगर व मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स फॉर गर्ल्स, मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे एस.एस.सी. व एच. एस.सी.मध्ये प्रथम,व्दितीय व तृतीय तसेच स्टुडंट ऑफ द इयर या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
यावेळी मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूलची प्रथम येणारी विद्यार्थिनी कु.शेख फैजीन फिरोज, व्दितीय कु.खान तरन्नुमजहाँ रिजवान, तृतीय कु. शेख आशना फातमा अकरम व आयडियल स्टूडंट ऑफ द इयर कु. शेख अशिया सरफराज तसेच मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स फॉर गर्ल्स येथील प्रथम कु. खान अफसाना मोहंमद उस्मान, व्दितीय कु. पठाण खतिजा शफिक, तृतीय कु.खान जकिया फातेमा शाहीदअली तसेच आयडियल स्टूडंट ऑफ द इयर कु. शेख तहेरीन नाज अब्दुल हसीब या गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेच्या वतीने ट्रॉफी देवुन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. प्रा.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज, संस्थेचे अध्यक्ष शेख लाल हुसैन, तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य शेख अ. अजीज अ. रहेमान, शेख अलाउद्दीन महेमुद, शेख शरफोद्दीन जैनोद्दीन, मिर्झा नवेद गयासबेग,शेख नसीर अब्दुल्ला,खान सलीम मुजफ्फर तसेच अरुणा आसिफ अली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सय्यद फरीदा गफ्फार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका मिर्झा फरहाना गालिब यांनी गुणवंत विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद बहार यांनी केले. अनुमोदन शेख अ. हसीब अ.सलाम यांनी केले. शेख नाजेमा जुल्फेकार यांनी सर्वांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111