shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मॉडेल स्कूल व्याहाळी येथील मुलांना खेळाच्या स्पर्धा, दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत योगासने व प्राणायाम करिता स्पोर्ट ड्रेस.*

*मॉडेल स्कूल व्याहाळी येथील मुलांना खेळाच्या स्पर्धा, दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत योगासने व प्राणायाम करिता स्पोर्ट ड्रेस.*
इंदापूर:दि 3 जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल व्याहाळी येथील पहिली ते सातवी मध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांना खेळाच्या विविध स्पर्धांसाठी व दर शनिवारी होणाऱ्या दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत प्राणायाम , योगासने , फनी गेम्स  याकरिता स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले.
           यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात पहिली दुसरी , तिसरी चौथी व पाचवी ते आठवी अशा गटामध्ये कला व क्रीडा स्पर्धेत मुलांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे व पुढील बीट पातळी व तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धा साठी मुलांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. सर्व मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
close