shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीर अण्णाभाऊंना अभिवादन करून "गाव तेथे राष्ट्रवादी" अभियानाला सुरवात...

लोकशाहीर अण्णाभाऊंना अभिवादन करून "गाव तेथे राष्ट्रवादी" अभियानाला सुरवात...

धरणगाव प्रतिनिधी -
: धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजपासून साळवा - साकरे गटातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून "गाव तेथे राष्ट्रवादी" संपर्क अभियानाची उत्साहात सुरुवात झाली. 

                   याबाबत सविस्तर वृत्त असे की, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घराघरात पोहचविण्यासाठी "गाव तेथे राष्ट्रवादी"- संपर्क अभियानांतर्गत पक्षाची विचारधारा, पक्ष संघटन व पक्षाची बांधणीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समतेचे प्रतिक पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून साळवा - साकरे गटातील बांभोरी, भवरखेडे, बोरगाव, जांभोरा, सारवे या गावातील जुने जाणते निष्ठावंत सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांचे कृषी विषयक धोरण, शैक्षणिक धोरण, महिला धोरण, सुशिक्षित युवक, यांसह लोकहिताचे तसेच समाजोपयोगी निर्णयांची माहिती देत प्रचार प्रसार करण्यास सुरूवात करून गावागावात पवार साहेबांच्या पक्षाचा विचार पोहचला पाहिजे जेणेकरून शेतकरी - कष्टकरी - महिला - अबालवृद्धांना सुखाचे दिवस येतील, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. एवढेच नव्हे तर "गाव तेथे राष्ट्रवादी" अभियानाच्या माध्यमातून मतदार संघातील प्रश्नांचे देखील अवलोकन यावेळी करण्यात आले.

       पहिल्या दिवशी बांभोरीचे धर्मा आबा, अशोक पाटील, भवरखेड्याचे भाईदास पाटील, संभाजी आबा, रविंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील,बोरगाव येथे अनिल पाटील, पुरुषोत्तम पाटील, नरेंद्र पाटील, गोरख पाटील, जांभोऱ्याचे विनायक पाटील, परेश गुजर, सुनिल गुजर, रमेश सपकाळे, सारवेचे रघुनाथ रामराव पाटील, जितेंद्र अहिरे, नाना मरसाळे, ईश्वर भिल आदी जुने जाणते सहकाऱ्यांशी भेट घेतली व अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या संपर्क अभियानप्रसंगी तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्वल पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, बांभोरीचे पी डी नाना, जांभोऱ्याचे भगवान शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


close