shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२०२१ ते आजचा प्रवास — ब्रँडअसूर : पुण्यातून डिजिटल मार्केटिंगमध्ये क्रांती घडवणारा ब्रँड...!

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ):-

पुणे, महाराष्ट्र – डिजिटल युगात व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी प्रभावी ऑनलाईन उपस्थिती आणि ग्राहकांशी जवळीक निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या गरजेला पूर्ण करत, ब्रँडअसूर या कंपनीने महाराष्ट्रात डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात स्वतःची ठळक ओळख प्रस्थापित केली आहे.


२०२१ मध्ये संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारती यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ब्रँडअसूरने, अल्पावधीतच आधुनिक, विश्वासार्ह आणि परिणामकारक डिजिटल मार्केटिंग सेवा पुरवून अनेक व्यवसायांना ऑनलाईन यशस्वी होण्यास मदत केली आहे.

प्रवासाची सुरुवात — स्वप्नातून वास्तवाकडे
प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात एका "शंकेच्या क्षणाने" होते,
आणि आमचीही तशीच झाली —
मनात प्रश्न होते, समोर अंधुक वाट होती,पण हृदयात एक आग होती — "काहीतरी वेगळं करायचं आहे!"

त्या काळात सोशल मीडियावर व्यवसाय करणं म्हणजे लोकांसाठी केवळ एक भ्रम होता, ब्रॅण्डअसूर साठी मात्र तेच भविष्य होतं.

२०१९ पासून घरातल्या एका खोलीत,
रात्रभर स्क्रीनसमोर बसून शिकलेलं प्रत्येक तंत्र,प्रत्येक नाकारलेली संधी, आणि प्रत्येक ‘होणार नाही’ या शब्दाच्या विरुद्ध लढत उभं राहणं —
यातूनच २०२१ मध्ये "ब्रॅण्डअसूर" चा जन्म झाला.

“आमचा उद्देश केवळ जाहिरात करणे नाही, तर प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार सानुकूलित, स्मार्ट आणि परिणामकारक डिजिटल धोरणे तयार करून व्यवसायाला वाढवणे हे आहे,” असे राजेंद्र भारती सांगतात.

ब्रँडअसूर च्या प्रमुख सेवा

सामाजिक माध्यमांवर विपणन (फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादी)

1.वेबसाईट डिझाइन आणि विकास

2.सर्च इंजिन ऑप्टिमाझाशन 

3.बुल्क संदेश व व्हॉईस कॉल विपणन

3.ग्राफिक डिझाइन आणि लोगो डिझाइन

4.आयव्हीआर सेवा आणि डिजिटल ब्रँडिंग

राजेंद्र भारती हे संगणक विज्ञान शाखेतील पदवीधर असून, प्रमाणित नैतिक हॅकर म्हणून संगणक सुरक्षा क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून ब्रँडअसूरने महाराष्ट्रातील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह आणि यशस्वी ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आजचा ब्रँडअसूर- 
आज ब्रँडअसूर पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटिंगमधील पहिला पर्याय म्हणून निवडला जात आहे.
ही केवळ कंपनीची यशोगाथा नाही, तर असंख्य व्यवसायांना डिजिटल युगात पुढे नेणाऱ्या प्रवासाची कहाणी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
 * www.brandasur.com
📧 info@brandasur.com
📞 +९१ ७८७५६२६१४८ / ७८८७६६१८४
close