एरंडोल प्रतिनिधी –एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पार्टी एरंडोल शहर, विखरण, रिंगणगाव मंडळाची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानावरून बोलताना मंडळ अध्यक्ष योगेश महाजन यांनी रक्षाबंधनानिमित्त मंडळातील लाडक्या बहिणींकडून आपला लाडका भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० हजार राख्या पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
बैठकीत हर घर तिरंगा, तिरंगा रॅली आणि विभाजन विभिषिका यांसारख्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा झाली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरचिटणीस अमरजितसिंग पाटील यांनी केले.
बैठकीस भिका कोळी, निलेश परदेशी, नाना देसले, संजय जाधव, भगवान मराठे, मोहन चव्हाण, किशोर पाटील, राहुल बडगुजर, किरण नन्नवरे, नितीन महाजन, सचिन विसपुते, अजित पाटील, रवींद्र महाजन, शेख अकील जयरोद्दीन, संदीप बोडरे, प्रमोद महाजन, मोतीलाल पाटील, अजय भोई, शामकांत बोरसे, रितेश परदेशी, वीरेंद्र दुबे, अविनाश सोनवणे, निखिल सूर्यवंशी, प्रकाश महाले, सतीश महाजन, मयूर ठाकूर, नितीन वाघ, राहुल महाजन, कुलदीप सूर्यवंशी, रवींद्र भोई, सौ. ज्योती वाणी, सौ. ज्योती धनगर तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.