एरंडोल – शहरासह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या प्रवक्ता ॲकडमीच्या AI लॅबचे उद्घाटन तसेच इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेत बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अमितदादा पाटील यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक डॉ. सुरेशजी पाटील, शेखर पाटील सर व शिवसेना शहर संघटक मयुरभाऊ महाजन उपस्थित होते.
या प्रसंगी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. विजय पाटील सरांनी संगणक व शैक्षणिक क्षेत्रात घेतलेल्या कष्टांची आठवण करून देत, त्यांच्या जिद्दीने व मेहनतीने उभी राहिलेली प्रवक्ता ॲकडमी आज गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.



