shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुक्यात महसुल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचे लाभ वाटप.

एरंडोल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महसुल सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत महसुल, आरोग्य व इतर विभागांचे विविध कार्यक्रम जळगांव लोकसभेच्या खासदार मा.स्मिताताई पाटील, आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

एरंडोल तालुक्यात महसुल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचे लाभ वाटप.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, जनप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांची उपस्थिती लाभली. यावेळी पेड माँ के नाम वृक्षारोपण, आरोग्य शिबिर उद्घाटन, आयुष्यमान भारत कार्ड व घरकुल चावी वाटप, कृषी व अन्य विभागांच्या योजनांचे लाभ प्रमाणपत्र वाटप, दिव्यांगांना ई-सायकल वाटप, तसेच उत्कृष्ट घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतींना गौरव करण्यात आला.

एरंडोल तालुक्यात महसुल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचे लाभ वाटप.

कार्यक्रमाद्वारे विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.


close