श्रीरामपूर / प्रतिनिधी :
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे राज्य OBC/VJNT प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी श्रीरामपूरला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
जिजामाता चौक येथे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या मंडळाने प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला. तर मेन रोड गांधी चौक येथे राजेंद्र देवकर यांच्या शिवसेना शारदा उत्सव मंडळाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष किसवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,
- आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे.
- पक्ष वाढीसाठी विकास आणि कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करून जनता पक्षाशी जोडली गेली पाहिजे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकहिताचा विचार समाजापर्यंत पोहोचवत आहे.
प्रदेशाध्यक्ष किसवे यांनी स्पष्ट केले की OBC/VJNT समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का दिला जाणार नाही. मूळ ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची हमी सरकारने दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी ठोस विचार केलेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, नीरज भैय्या मुरकुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सारिका वाव्हळ, उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच, श्रीरामपूर शहराध्यक्ष विठ्ठल गोराणे, तालुका अध्यक्ष सागर कुदळे, निलेश शिंदे, संतोष कांबळे, विशाल दुर्गे, राजेश वाव्हळ, संभाजी देवकर, प्रशांत खळेकर, गिरीश वाढेकर, महिला शहराध्यक्षा सविता किशोर वडिले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष किसवे यांच्या या दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षबांधणी, निवडणूक तयारी आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला.

