shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शास्त्री फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली, व्याख्यान व रक्तगट शिबिर.

  “फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे”...डॉ. विजय शास्त्री


शास्त्री फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली, व्याख्यान व रक्तगट शिबिर

एरंडोलशास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ येथे जागतिक फार्मासिस्ट दिन (२५ सप्टेंबर) विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

शास्त्री फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली, व्याख्यान व रक्तगट शिबिर

सकाळी एरंडोल शहरात काढलेल्या भव्य रॅली व पथनाट्याद्वारे नागरिकांना औषधोपचारातील योग्य मार्गदर्शन व फार्मासिस्टच्या कार्याबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीत एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी अध्यक्ष कैलास न्याती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समारोपावेळी कार्यरत फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला.

शास्त्री फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली, व्याख्यान व रक्तगट शिबिर

दुपारच्या सत्रात प्रा. संजय लढे यांनी विद्यार्थ्यांना “शैक्षणिक प्रगतीसोबत सर्वांगीण विकासाचे महत्त्व” अधोरेखित करणारे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर फार्मसी क्षेत्रातील करिअर व जागतिक आरोग्य व्यवस्थेतील भूमिका यावर व्याख्यान दिले.सामाजिक जाणीव म्हणून पळासदळ गावात मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शास्त्री फार्मसीत फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली, व्याख्यान व रक्तगट शिबिर

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विजय शास्त्री, सौ. रूपा शास्त्री व डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शास्त्री यांनी “फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे” असे प्रतिपादन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रा. अनुप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. जावेद शेख यांनी आभार मानले.

close