shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरीब विद्यार्थिनीच्या MBBS शिक्षणाचे पालकत्व त्रिवेदी दांपत्याकडे..!

गरीब विद्यार्थिनीच्या MBBS शिक्षणाचे पालकत्व त्रिवेदी दांपत्याकडे..!

एरंडोल – आशा किशोर बिराडे या घरकाम करणाऱ्या महिलांची मुलगी कुमारी तेजश्री बिराडे हिने NEET परीक्षेत यश मिळवत मुंबईतील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे MBBS प्रवेश मिळवला आहे.तिच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च,म्हणजे कॉलेज फी,हॉस्टेल,मेस, पुस्तके व कपडे याची जबाबदारी शहरातील नामवंत विधीज्ञ अॅड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा ओम त्रिवेदी यांनी स्वीकारली आहे.

यावेळी अॅड. त्रिवेदी यांनी प्रत्यक्ष तेजश्रीला रु. ५०,००० देऊन या पवित्र कार्याची सुरुवात केली.पतीच्या निधनानंतर काबाड कष्ट करून मुलांना शिकवणाऱ्या आशा बिराडे यांना या मदती मुळे मोठा आधार मिळाला आहे. तेजश्रीने स्वतः शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच गरीब मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा संकल्पही व्यक्त केला.

या प्रसंगी महाराणा प्रताप सिंग शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील, प्रा. राखी पाटील, तसेच डॉ. राजेंद्र चौधरी उपस्थित होते.


close