एरंडोल प्रतिनिधी – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी शहरातील प्रमुख कार्यालय प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की माहितीचा अधिकार कायदा २००५ हा नागरिकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण देणारा महत्त्वपूर्ण कायदा असून त्याचा प्रसार-प्रचार करणे ही शासनाची जबाबदारी आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांना या कायद्याची उपयोगिता व्हावी यासाठी प्रत्येक शासकीय संस्थेने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने देखील या दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करावी, असा शासन निर्णय असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर पुढील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत :
तालुकाध्यक्ष : सिताराम मराठे
तालुका उपाध्यक्ष : तुषार शिंपी
संपर्क प्रमुख : नितीन ठक्कर
सक्रिय सभासद : राजधर महाजन
प्रचार संयोजक : प्रा. आर. एस. निकुंभ
प्रचार समन्वयक : विज्ञान पाटील
सहप्रचार समन्वयक : प्रभाकर महाजन
सक्रिय संघटक : राहुल महाजन
सहप्रचार : भुषण चौधरी, निलेश चौधरी


