shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरत शिरसाठ यांची बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळात सत्कार.

भरत शिरसाठ यांची बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळात सत्कार

प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल संचालित जे.एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयाचे प्रभारी मुख्या ध्यापक भरत आत्माराम शिरसाठ यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे यांच्या बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरा, राजू मणियार, सतीश परदेशी, डॉ. नितीन राठी, अनिल बिर्ला, सुनील झवर, प्रवीण झवर, डॉ. अजय बियाणी, परेश बिर्ला, जगदीश बिर्ला, धीरज काबरा, सतीश काबरा, यश मणियार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रा.ति. काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील राठी, स. नं. झवर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील, रा.ही. जाजू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोलचे प्राचार्य हैरी जॉर्ज यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

भरत शिरसाठ यांनी यापूर्वी नाशिक विभागातील इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून काम पाहिले असून “इलिस आणि चेस” इंग्रजी विषय प्रोजेक्टमध्ये जळगाव जिल्ह्याचे मेंटॉर व एमइआर म्हणूनही कार्य केले आहे. तसेच इंडिया–बांगलादेश टेलीकोलॅबोरेशन प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक, SCERT मार्गदर्शक लेखन समिती सदस्य, तसेच विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षक आर. एम. कुलकर्णी यांनी केले.

close