shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हैद्राबाद गॅजेटच्या आधारे धनगर-बंजारा समाजास आरक्षण देण्यास भिल समाज विकास मंचाचा विरोध.

हैद्राबाद गॅजेटच्या आधारे धनगर-बंजारा समाजास आरक्षण देण्यास भिल समाज विकास मंचाचा विरोध.

एरंडोल : हैद्राबाद गॅजेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शविणारे निवेदन भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे एरंडोल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासह संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

निवेदनात अनुसूचित जमातीची यादी ही केवळ राष्ट्रपती आदेश व संसद अधिनियमानेच ठरू शकते, हैद्राबाद गॅजेटला कोणतेही कायदेशीर बळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. धनगर-बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या व ओबीसी प्रवर्गात मोडतो, त्यांचा आदिवासी समाजाशी सांस्कृतिक वा ऐतिहासिक संबंध नाही, असेही नमूद करण्यात आले.

आदिवासी आरक्षणात घुसखोरी सहन केली जाणार नाही, असे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत याप्रसंगी सर्वपक्षीय आमदारांचा निषेध करण्यात आला. या वेळी दिपक अहिरे, सागर वाघ, भैय्यासाहेब मोरे, निहाल सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे...
close