shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत काबरे विद्यालयाचा यशस्वी सहभाग.

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत काबरे विद्यालयाचा यशस्वी सहभाग.

एरंडोल :- अमळनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत रा. ति. काबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार यश संपादन केले.17 वर्षे आतील 52 किलो गटात कु. यामिनी भानुदास आरखे प्रथम विजेती ठरली.त्याच बरोबर 81 किलो गटात भावेश भानुदास आरखेने प्रथम क्रमांक मिळविला.14 वर्षा खालील गटात मुकेश दिलीप सोनवणे (35 किलो) व रोशन उमेश पाटील (50 किलो) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या यशामुळे सर्व विद्यार्थ्यांचा विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्रशिक्षकांना शालेय समिती व संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

close