shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी –“पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण” या घोषणांनी दुमदुमले गाव.

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी –“पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण” या घोषणांनी दुमदुमले गाव.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत उपक्रम.

प्रतिनिधी | पिंपळे

ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा एक अनोखा उपक्रम पिंपळे खु येथे पार पडला. “पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण” या घोषणा देत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली.

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी –“पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण” या घोषणांनी दुमदुमले गाव.

या उपक्रमात कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डोक्यावर वृक्ष घेऊन गावातून दिंडी काढली. पालखीच्या माध्यमातून वृक्षांची आरती करून गावकऱ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी –“पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण” या घोषणांनी दुमदुमले गाव.

या प्रसंगी पिंपळे बु चे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, पिंपळे खु च्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, ग्रामविकास अधिकारी के.के. लंकेश, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक सी.एन. पाटील आणि शिक्षक डी.बी. पाटील, जी.जे. पाटील, हर्षल पवार, निकम सर, श्रीमती गुमानर मॅडम, श्रीमती बाविस्कर मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामस्थ पुरुषोत्तम चौधरी, नाना चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी “🌱 पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, पर्यावरणाकडे देऊया ध्यान मगच बनेल आपला देश महान” अशा घोषणांनी गावभर जागरूकता निर्माण केली.

शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

close