shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल महाविद्यालयात वाणिज्य विभागाअंतर्गत डिजिटल अर्थव्यवस्थेवर व्याख्यान व वाणिज्य मंडळाचे उद्घाटन.

एरंडोल महाविद्यालयात वाणिज्य विभागाअंतर्गत डिजिटल अर्थव्यवस्थेवर व्याख्यान व वाणिज्य मंडळाचे उद्घाटन.

एरंडोल
– दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील वाणिज्य विभागाअंतर्गत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व डिजिटल अर्थव्यवस्था या विषयावर व्याख्यानाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आधुनिक कौशल्य आत्मसात करून बाजारपेठेतील संधी ओळखून त्याचे सोन करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सतत नवीन ज्ञान आत्मसात करून स्वतःला स्पर्धेच्या युगात अपडेट ठेवावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या उपप्राचार्य प्रा. डॉ. विजयानंद वारडे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव) यांनी “भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटलायझेशन स्वीकारले गेले असून त्यामध्ये सतत बदल होत आहेत. या डिजिटल क्रांतीतून वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कमी वेळेत अचूक काम करण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी डिजिटलाईज कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन केले.

दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गौरव महाजन यांनी “भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीत वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. या संधींचा योग्य वेळी लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कौशल्य आणि तंत्रज्ञान आत्मसात करावे.” असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनी शुभेच्छा दिल्या. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप कोतकर यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

विद्यार्थिनी कु. हर्षदा ठाकरे, कु. उर्मिला बैरागी व कु. प्राची बडगुजर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर कु. दिव्या चौधरी, कु. गायत्री चौधरी व कु. हर्षदा मराठे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अतुल पाटील यांनी केले.

या वेळी प्रा. विजय गाढे, श्री. शेखर पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. जितेंद्र महाजन, प्रा. मोमीन शेख यांसह प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


close