राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टीमच्या उपस्थितीत शारीरिक,दंत व डोळ्यांची तपासणी.
एरंडोल : रा.ती.काबरे विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम घेण्यात आली. या उपक्रमात डॉ. संकेत पाटील, डॉ. तेजल वानखेडे, तसेच फार्मासिस्ट हेमंत जगताप आदी उपस्थित होते.
या तपासणीदरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या ओळखून काहींना तात्काळ मार्गदर्शन व किरकोळ आजारांवर उपचार करण्यात आले.
डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, पौष्टिक आहाराचे फायदे, तसेच नियमित व्यायामाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक होण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टीमचे आभार मानले.