एरंडोल (ता. १६ सप्टेंबर) : एरंडोल येथील डी.डी.एस.पी. महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियममध्ये एरंडोल तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अमित दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य श्री एन. बी. गायकवाड, क्रीडा समन्वयक श्री मनोज पाटील, विखरण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप आप्पा देसले, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री शेखर पाटील, क्रीडा शिक्षक श्री एस. एस. पाटील यांसह एरंडोल तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे क्रीडा शिक्षक, सहभागी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.