शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
शैक्षणिक बातमी
पिंपळनेर - येथील अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त साजरा होणाऱ्या जनजाती गौरव वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची मराठी विभागातर्फे विभाग प्रमुख प्रा राजेंद्र सोनवणे यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यात विद्यार्थ्यांना " मला समजलेलेआदिवासी क्रांतिकारक" विषय देण्यात आला होता.या विषयावर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मनेष माळी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका छाया साखरे उपस्थित होत्या. प्रथमतः विर क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील शिक्षक शरद सुर्यवंशी यांनी जनजातीय गौरव वर्षाचे महत्व सांगत क्रांतिकारक वीरांच्या जीवनावर भाष्य केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.प्रविण पगारे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.विजय ठाकरे यांनी व आभार प्रदर्शन शिक्षक संदिप पवार यांनी केले.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.वसंत गावीत,प्रा.पोर्णिमा भामरे, शिक्षिका चारुशीला पवार, शिक्षिका आशा लाडे यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.गणेश भावसार,प्रा.भिकन पारधी, शिक्षक संदिप पवार व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रयत्नशील होते.

