जेष्ठ कार्यकर्ते व पत्रकार दिलीप घरटे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
सामोडे येथील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांची भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहर मंडळ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
घरटे हे सामोडे येथील साईबाबा पाणी वाटप संस्थेचे चेअरमन, पिंपळनेर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, सामोडे वी.का.सो.चे माजी चेअरमन तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी उपाध्यक्ष आहेत. सामाजिक, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.
घरटे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी माजी सरपंच देविदास जिरे, अभियंता डी. के. इंगळे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महाजन, निवृत्त शिक्षक भगवान रायते, सामाजिक कार्यकर्ते नारायण जिरे, अॅड. अशोक घरटे, प्रदीप वैद्य, पत्रकार राजेंद्र गवळी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ शंखपाळ, अक्षय महाजन, माजी मुख्याध्यापक रमेश गवळी, ओम शांती सेंटरच्या अध्यक्षा ठगुबाई जिरे, अंगणवाडी शिक्षिका शालिनी घरटे, शोभा महाजन, गोविंद गवळी, नाना गवळी, बापू गवळी, उद्धव जिरे, जितू जाधव, दादाजी जाधव, भूषण गवांदे, जगन्नाथ शंखपाळ, मधुकर महाजन, भगवान महाजन, भाऊसाहेब देशमुख, पत्रकार तुषार महाजन, पत्रकार विशाल रायते, पुष्पराज नाहीरे, गजानन इंगळे, डॉ. जानवी महाजन, निकिता घरटे, यामिनी घरटे, दिपाली महाजन, नीता रायते, अर्चना रायते, गौरी जिरे, श्रद्धा जिरे, प्रसाद रायते, अमित घरटे, सनी घरटे, निखिल घरटे, विकी साळवे, वैभव जिरे, गिरीश रायते, जिग्नेश जिरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
घरटे यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहर मंडळाला नवे बळ मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

