श्रीरामपूर / प्रतिनिधी:
१५०० वा जश्ने ईद मिलादुन्नबी (स.) निमित्त अहमदनगरमध्ये सिरतुनबी क्विझ कॉम्पिटिशन सिझन दोन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पैगंबर हजरत मुहम्मद मुस्तफा (स.) यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रश्नोत्तर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान प्रदर्शित केले.
स्पर्धेत पहिला क्रमांक तहेरीन शकील कुरैशी (₹ ११०००/-), दुसरा क्रमांक उम्मे फायजा आसिम कुरैशी (₹ ७०००/-) आणि तिसरा क्रमांक नाजीया बुरहाण शेख (₹ ४०००/-) असे तीन बक्षीसे देण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
१५०० व्या जश्ने ईद मिलादुन्नबी या पवित्र पर्वानिमित्त मदरसा कादरिया अंजुमन-ए- जमीयतुल कुरेश, अहमदनगर तसेच आला हजरत ताजुल फुहुल अकॅडमी शाखा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पैगंबरांच्या जीवनावर आधारित क्विज कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुणे व जज म्हणून पुणे येथील राहतअली कुरैशी, हाफीज जुल्फेकार, हाफीज अनीस कुरैशी, ईमरान शेख आदी उपस्थित होते.
अल्लाहच्या रसूल यांचे जीवन संपूर्ण मानवजाती साठी आदर्श आहे. त्यांची सीरत म्हणजे अखंड मार्गदर्शनाचा प्रकाश आहे.
या सिरतुनबी क्विझ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पैगंबर यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वांनी पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे आपले जीवन घडवावे, हेच या स्पर्धेचे खरे यश आहे.असे प्रतिपादन नालबंद मस्जिदचे पेशइमाम मौलाना मोहम्मद अदनान कादरी यांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. आयोजकांचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111