*प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
केज शहरातील शिक्षक कॉलनी, बीड रोड केज येथे राहुल प्रतिष्ठान आयोजित पारंपरिक मानाचा गणेश मंडळाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने एकजुटीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील संस्कृतीचे जतन करून कुठलाही धांगडधिंगा न करता व गणेश उत्सवाचे पावित्र्य राखून राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज ने एक आदर्श निर्माण केला आहे.
दहा दिवस चालणारा उत्सव पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून,रोज सकाळी, संध्याकाळी श्री. व सौ. यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महिला भजनी मंडळ, काकड आरती, व विविध प्रकारचे भजन गाणी महिला भजनी मंडळींनी एकत्र घेऊन या राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज आयोजित गणेश उत्सवाची परंपरा जपून युवकांना आदर्श घालून दिला.
केज पोलिस ठाण्याचे कृतव्यदक्ष पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवने, गटनेते हारुणभाई इनामदार, माजी सभापती विष्णू भाऊ घुले, नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड, नगरसेवक सुग्रीव भाऊ कराड, शिवाजी अप्पा हजारे, शिवाजी घुले, लक्ष्मण जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शक दत्ता धस पंत, भगवान केदार, पिटू भैय्या तांदळे, राजेश गवळी, संदीप भुतडा, अरुण बप्पा धस, प्रकाश मुंडे, खय्युम शेख, चंदू चौरे, अमोल धस, ठोंबरे बंधू, राजेभाऊ मुळे, सोनू धस, गोटू भैय्या पाळवदे, सुनील घोळवे, डॉ विजयकुमार धस, रमेश धस , नितीन धस साहेब, गोविंद घोळवे, रवि अंधारे, पिंटू अंधारे, गोविंद काळे, नवनाथ काकड सर, रमाकांत ढाकणे सर, नवनाथ घुले, अशोक धस, मुकुंद घुले, मुळे बापू, नारायण घुले, आमर केजकर, विकास मुळे, वैभव डोईफोडे, वैभव केंद्रे, मनोज मस्के, बबलू भैय्या साखरे, प्रशांत धस, एम,डी, घुले सर, रवि घुले,आनंत आघाव सर, घोळवे हानुमंत, अमोल मुंडे बंधू, वसंत डोईफोडे, चौरे मामा, मयुर टकले, काका बच्छाव,सोहम अंधारे, संग्राम भोसले, अजय मैंद, सुशांत केदार, विक्की घोडके, राजसाहेब ढाकणे, नागरगोजे साहेब, रामहरी घुले सर, अमोल घुले, प्रविण साबळे, गालफाडे तात्या, पप्पू गायकवाड, बाबासाहेब केदार सर, गणेश कुलकर्णी, विकास बिक्कड, प्रविण वाघमारे, योगेश हांगे, मुंडे सर व राहुल प्रतिष्ठान चे सर्व सहकारी मित्र , महिला मंडळ शिक्षक कॉलनी भागातील लहान थोर मंडळी, बच्चे कंपनी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शिक्षक कॉलनी परिसरातील सर्वांनी या मंगलमय उत्साहात एकीचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला आहे. विसर्जनाच्या दिवशी श्री गणेशाची भक्ती भावाने पूजा व आरती करण्यात आली व भव्य मिरवणूक काढण्यात आली , राहुल प्रतिष्ठान आयोजित मिरवणूकीमध्ये महिला मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मिरवणुकी शोभा वाढवली . तसेच राहुल प्रतिष्ठान च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . या महाप्रसादाचा लाभ जवळपास 1100 ते 1200 भाविक भक्तांनी घेतला. गणपतीची भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन महाआरती करून करण्यात आले. राहुल प्रतिष्ठान आयोजित पारंपरिक मानाचा गणेश मंडळाने सांस्कृतिक परंपरा जपून एक आदर्श निर्माण करून दिला आहे.