shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल महाविद्यालयात महसूल पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांना दाखले वाटप.

एरंडोल महाविद्यालयात महसूल पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांना दाखले वाटप.

एरंडोल – महसूल पंधरवड्यानिमित्त दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील तर प्रमुख अतिथी प्रांताधिकारी मा. मनीषकुमार गायकवाड उपस्थित होते. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविकातून पंधरवड्याचे महत्त्व स्पष्ट केले.

या वेळी उत्पन्न, जात, नॉन क्रिमिनलिअर आदी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करून ऑनलाइन सेवा घेण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी तहसील कार्यालयाचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. मीना काळे यांनी तर आभार डॉ. अतुल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.

close