shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र साशंकन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे तहसीलदारांना निवेदन

एरंडोल तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र साशंकन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे तहसीलदारांना निवेदन

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात एरंडोल तहसील कार्यालयात गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून प्रतिज्ञापत्र(Affidavit) साशंकन प्रक्रिया बंद असल्याने सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
एरंडोल तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र साशंकन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे तहसीलदारांना निवेदन

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शैक्षणिक कामकाज व विविध शासकीय योजनांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. मात्र साशंकन प्रक्रिया बंद असल्याने नागरिकांना नोटरीकडे जावे लागत असून त्यासाठी ३०० ते ५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. शिवाय अनेक शासकीय कार्यालये नोटरीकृत कागदपत्रे ग्राह्य धरत नसल्याने शिष्यवृत्ती व शासकीय योजनांचा लाभ अनेकांना मिळत नाही.

म्हणूनच तहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्र साशंकन प्रक्रिया तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, ॲड. दिनकर पाटील, ईश्वर भाऊ सोनार, मुकुंद ठाकूर, डॉ. प्रशांत पाटील, राठोड सर, बबन वेडू वंजारी, शेख मुख्तार, शेख लाला पटवे आदींसह तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close