shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तीर्थक्षेत्र रामदरा येथे गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र रामदरा येथे गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

लोणी काळभोर (पुणे):
गोल्डन सियारा पब्लिक स्कूल, कवडीपाठ आणि ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी तीर्थक्षेत्र रामदरा (लोणी काळभोर, पुणे) येथे स्काऊट-गाईड विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश चंद सर व उपाध्यक्ष रमेश चंद सर तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप सर आणि हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 
या उपक्रमामध्ये शाळेच्या स्काऊट-गाईड विभागातील २८ स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ओळखून वृक्षारोपणाचा संकल्प करत समाजाला पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी संदेश दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती खणगे मिस तसेच उपमुख्याध्यापक प्रदीप भिसे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक कार्याचे अभिनंदन केले.संपूर्ण वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व मार्गदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक तथा स्काऊट-गाईड विभाग प्रमुख हेमंत डोईफोडे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
close