भरत शहा यांनी घेतलेले भव्य आरोग्य शिबिर गरजू रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
भव्य आरोग्य शिबिराचा 3790 जणांना लाभ.
इंदापूर: मी नेहमीच लोकांना सांगत असतो की, आरोग्याचे काम खूप महत्त्वाचे काम आहे. एखाद्या गरीब माणसाला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटते व ते पुण्यलाभते. आरोग्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे . अजितदादांनी अनेक रुग्णांना मदत केली.इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेतलेले भव्य आरोग्य शिबिर गरजू रुग्णांसाठी खूप मोठे सर्वात महत्त्वाचे आज पार पडत आहे.
तसेच आज कै. गोकुळशेठ शहा , स्वर्गीय शंकराव पाटील , स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप यांनी इंदापूर तालुक्यात खूप कामे केली आपण देखील त्यांच्या विकासाचा वासा पुढे घेऊन जात असून इंदापूर तालुक्यातील विकासाची दृष्टीने घोडदौड सुरू आहे .इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात अधिक सुविधा कशा आणता येतील. शिवाय इंदापूर तालुक्यात आधुनिक रुग्णालय निर्माण करण्याची गरज आहे. इंदापूर शहरातील व्यंकटेश मंदिराची खूप महत्त्वाची मागणी होती आपण दोन कोटी रुपये दिले. नगराध्यक्ष भरत शहा आणि प्रशांत उंबरे यांची मागणी होती त्यांनी मला एक कोटी मागितले मी त्यांना दोन कोटी दिले .
अगोदरच दोन कोटी आणि आताचे दोन कोटी. असे 4 कोटी देत असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे ,इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा,शहा ग्लोबल स्कूलचे संचालक मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, गटनेते शकीलभाई सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी सभापती विलास माने, चित्तरंजन पाटील, सचिन सपकळ, कांतीलाल झगडे, मधुकर भरणे, श्रीराज भरणे ,लक्ष्मण हरणवळ मच्छिंद्र चांदणे, शिवाजीराव तरंगे, डॉ.विद्युत शहा ,संजय शहा, रोहन हेगडे, मिलिंद खाडे, डॉक्टर थोरवे सुहास शेळके, श्रेणिक शहा, उदय कुरुडकर ,अनिल शिर्के,मुख्याधिकारी रमेश ढगे , नगरसेवक, शासकीय विभागाचे अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.
------------------------------
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे- नगराध्यक्ष भरत शहा.
-------------------------
या आरोग्य शिबिरात
अँजिओग्राफीसाठी 46 रुग्ण,
ईसीजी तपासणी ,
रक्तदाब तपासणी ,
रक्त गट तपासणी
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 30 रुग्ण, मोफत 400 चष्मा वाटप ,
डोळे तपासणी ,
शुगर तपासणी ,
काना घसा तपासणी ,
मशीनद्वारे कानाची तपासणी ,
महा आयडी, ऑनलाइन रेशन कार्ड, आधार कार्ड, बालरोग तपासणी, रक्तदान,
सिटीस्कॅन तपासणी नोंदणी करण्यात आली. या प्रकारच्या 3790 रुग्णांनी
या शिबिरामध्ये लाभ घेतला.
यावेळी इंदापूर क्रिटी केअर, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, गिरीराज हॉस्पिटल, बारामती ,पवार चॅरिटेबल ट्रस्ट ,भारती हॉस्पिटल, पतंजली योग समिती, मेडिक्युअर ब्लड बँक, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर, विश्वराज कराड हॉस्पिटल इत्यादींचे सहकार्य लाभले.
ज्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्यात आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत त्यांच्यासाठी आयोजकाकडून मदत केली जाणार आहे.

