shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक व्यक्ती - एक वृक्ष, हरित भविष्यासाठी एक संकल्प; सामाजिक कार्यकर्ते अक्षय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना सहभागाचे आवाहन

वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; ग्रीन फाउंडेशनच्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन! 

पुणे प्रतिनिधी:
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थीहितैषी व निसर्गप्रेमी श्री. अक्षय संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. "झाडे लावा, झाडे जगवा... हरित महाराष्ट्र घडवा!" या प्रेरणादायी संदेशासह हा उपक्रम मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता काळभैरवनाथ मंदिर, केसकर वस्ती, रामदरा रोड येथे उत्साहात पार पडणार आहे.
ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य ही संस्था सामाजिक, पर्यावरणपूरक व जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने समाजसेवेचे कार्य करत असून, यावर्षीही पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करत वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. "एक व्यक्ती – एक वृक्ष, हरित भविष्यासाठी एक संकल्प" या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.

या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी व सभासद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, झाडांचे संवर्धन आणि भावी पिढीसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्पही उपस्थितांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या हस्ते एक वृक्ष लावण्याचे व पर्यावरण संवर्धनासाठी आपले मोलाचे योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "वाढदिवस साजरा करूया एका झाडासोबत आणि हरित भविष्यासाठी एकत्र येऊया" हा संदेश देत प्रत्येकाच्या उपस्थितीने या अभियानाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

"वसा समाजकार्याचा... संकल्प हरित भविष्याचा!" या ब्रीदवाक्याप्रमाणे ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य समाजहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असून, या भव्य वृक्षारोपण अभियानास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन टीम ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
close