जि.प.शाळेच्यावतीने १५ चारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाल दिंंडी मोठ्या उत्साहात संपन्न
अजीजभाई शेख / राहाता;
राहाता तालुक्यातील १५ चारी येथे कै.सजन यशवंत सदाफळ व कै.भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ बांधण्यात आलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (१५ चारी) च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त बाल दिडींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ पाटील, कैलास सदाफळ पाटील यांचेकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विधिज्ञ रामनाथ सदाफळ म्हणाले की,बालपणीच मुलांवर अध्यात्मिक संस्कार झाले तर त्यातुन सुसंस्कारित गाव,राज्य, आणि बलशाली प्रगतीशील भारत घडविण्यास मोठी मदत होईल.संंस्कारीत पिढी घडल्यास समाजातील अत्याचार,व्यभिचार गुन्हेगारी कमी होवून बलशाली तथा सुसंस्कृत आणी बलशाली असा आपला देश होईल असे ते म्हणाले.तसेच शाळेेचे मुख्याध्यापक वडणे सर समवेत शाळेचे शिक्षक वर्ग हे शाळेतील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करीत असल्याने यासोबतच विविध शैक्षणिक तथा सामाजाभिमूख उपक्रम राबवीत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील जानकी गोर्डे मॅडम,बाजीराव बनसोडे सर आणि शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी चालीवर भक्ती गीत सादर केले.यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष सचीन आरणे, देवचंद आरणे, संदीप आरणे महिला भगिणींसह मुख्याध्यापक मच्छिंद्र वडने,सुरेश भिंगारदिवे,अमोल तुम्हारे, संदीप धिवर,बालाजी ऐंदवाड,अमोल पाळंदे, सुवर्णा सदाफळ, दिपाली सदाफळ आदि उपस्थित होते.स्वामी सदाफळ, मनोज सदाफळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

