सराटीत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ड्रेस वाटप.
इंदापूर - महाराष्ट्राचे लोकप्रिय दिवंगत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निमित्त सराटी जिल्हा परिषद शाळा येथे फोटोला विनम्र अभिवादन करून सामाजिक उपक्रम म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करून यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, उपसरपंच संतोष कोकाटे, रोहित जगदाळे, अमर जगदाळे, मनोज जगदाळे , समीर तांबोळी, बाबासाहेब कोकाटे, राहुल जगदाळे ,उत्तम जाधव, शिवप्रसाद जगदाळे, तानाजी मिसाळ ,तुकाराम चिकाटे ,शंकर जगदाळे ,राहुल कोकाटे, दगडू चिकाटे इत्यादी उपस्थित होते
अशी माहिती संतोष कोकाटे यांनी दिली.

