shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाच्या हृदय स्पर्शी वेदना 🌹

दगड फोडून जग घडवलं, आज अश्रूंनी भिजला संसार।
वडारांच्या वेदनेला, कधी मिळणार न्यायाचा आधार॥


हातोडा गेला, छिन्नी हरली,
उजाड झाली कष्टांची वाडी।
चूल विझली, भाकर हरपली,
डोळ्यांत दाटली दुःखाची वाडी॥

रस्ते, धरणे, मंदिरे घडविली,
घामाने लिहिला इतिहास।
घडविणारे आजच फिरती,
घेऊन वेदनेचा श्वास॥

काम गेले, धंदा गेला,
हरपला जगण्याचा आधार।
भुकेपोटी फिरती लेकरं,
कोण ऐके हा आक्रोश फार॥

शिका रे लेकरांनो शिका,
ज्ञानच आहे खरा शृंगार।
एकजुटीने पुढे चला रे,
उजळेल वडारांचा संसार॥

विठ्ठला आता धावून ये रे,
पुस रे डोळ्यांतील अश्रुधार।
कष्टकरी या वडार समाजाला,
दे पुन्हा मान, दे रोजगार॥

प्रस्तुती: "शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम अहिल्यानगर"
गितकार: "रमेश जेठे सर जिल्हा अहिल्यानगर"
close