shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर
इंदापूर(पुणे, दि. ९) : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

पंचायत समितीनिहाय जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचा तपशील 
इंदापूर पंचायत समिती- अनुसूचित जाती, जुन्नर- अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर- नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ- नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.
close