संस्थाचालक शिक्षण मंडळ सहसचिव पदी वीरसिंह रणसिंग यांची निवड
इंदापूर :इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता इंदापूर संस्थेचे सचिव वीरसिंह विश्वासराव रणसिंग यांची संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा सहसचिव पदी निवड झाली.सन २०२५ ते २०२८ कालावधीसाठी सहसचिवपदी त्यांची निवड झाली.संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय कोलते,उपाध्यक्ष प्रमिला गायकवाड, खजिनदार महेश ढमढेरे,सचिव संग्राम कोंडे देशमुख,संचालक प्रदीप वळसे पाटील, संचालक नंदकुमार निकम,संचालक भाऊसाहेब ढमढेरे इ. मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.सहसचिव वीरसिंह रणसिंग यांनी शासनस्तरावर संस्था व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न, नविन शैक्षणिक धोरणानुसार शहरी व ग्रामीण भागातील संस्था यांच्या प्रगतीसाठी संस्थाचालक शिक्षण मंडळासोबत काम करण्यात येईल. संस्थाचालक शिक्षण मंडळात तालुकानिहाय संचालकांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.मागील कार्यकारिणीमध्ये संचालक पदी कार्यरत राहिल्यामुळे सहसचिवपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.ग्रामीण भागातील संस्थाचालकांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.संस्था चालक शिक्षण मंडळाने दाखवलेला विश्वास व काम करण्याची दिलेली संधी याबद्दल रणसिंग यांनी कार्यकारिणी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.रणसिंग यांची संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,विश्वस्त वीरबाला पाटील, विश्वस्त राही रणसिंग, कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळ - संस्थाचालक शिक्षण मंडळ सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल विरसिंह रणसिंग यांचा सन्मान करताना उपाध्यक्ष अनिल मेहेर व पदाधिकारी