ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव (ह) येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यातील नीळ पाटील परिवारातील मार्गदर्शक ह. भ. प. बाळासाहेब नीळ पाटील यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित मौजे निमगाव हवेली ता. करमाळा येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनकर ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरी कीर्तनाचा कार्यक्रम दि. १४/११/२०२५ रोजी सायं. ५ वाजता ठेवण्यात आला आहे.
तसेच सायं. ८ ते ११ वाजता सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री बाळासाहेब वाईकर गुरुजी, संगीत अलंकार शिवानंद स्वामी पुणे, ह.भ.प. सतीश महाराज सूर्यवंशी व तबला साथ ताल सम्राट शेखर दरवडे अहिल्यानगर यांचा सुगम संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी निमगाव हवेली व पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी तसेच किर्तन, व भजन प्रेमी भाविकांनी या आनंदमयी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अविनाश बाळासाहेब पाटील व डॉ.सौ.पद्मिनी अविनाश पाटील यांनी केले आहे.

