*पुणे दि. ५ - पुणे जिल्हा कुंभार समाज उन्नती मंडळाचा कौटुंबिक स्नेह मेळावा गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे मा.सरचिटणीस सुभाषजी तेटवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.कार्याध्यक्ष विशालशेठ शिंदे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करून कु.तनया झोजे हिने स्वागतगीत सादर केले. अध्यक्ष बाबाजी कुंभार यांनी प्रास्ताविकेतून स्नेहमेळाव्यातील सर्व कार्यक्रम,मंडळ राबवित असलेले विविध उपक्रम व भविष्यातील समाजासाठी करावयाची कामे याविषयी माहिती दिली.
आमदार हेमंतजी रासने यांच्या हस्ते डॉ.उदयन दीक्षित यांना संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार , बाळासाहेब कुंभार जेजुरीकर यांना समाज भूषण पुरस्कार तसेच स्व.प्रमोददादा भिगवणकर यांना मरणोत्तर समाजकार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. यावेळी डॉ.उदयन दीक्षित यांनी पुरस्कारानंतर आपल्या मनोगतात पुरस्कार दिल्याबद्दल समाजाचे आभार व्यक्त केले. यावेळी दहावी, बारावी,पदवी,पदविका, विशेष नैपुण्य व विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजातील विविध पदांवर नियुक्ती झालेल्या बांधवांचे सत्कार करण्यात आले.ज्येष्ठ व श्रेष्ठ उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार गजानन भागवत यांना देण्यात आला.तसेच मानपत्राचे लेखन करणारे प्रकाश रसाळ यांचा व मूर्तीकला जतन ठेवण्यासाठी विशेष कार्य केलेल्या प्रवीण बावधनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.दिगंबर इंगळे यांनी मंडळाच्या मागील वर्षभरातील राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतलेल्या कुंभविकास या साप्ताहिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.हडपसर महिला आघाडी अध्यक्षा उषाताई सोमवंशी यांनी स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, गुरुवर्य, कै. कृष्णाजी गोपाळ कुंभार (सुपेकर) यांच्या स्मरणार्थ दोन शिष्यवृत्ती ,गुरुवर्य कै. दत्तात्रय नारायण सोमवंशी यांच्या स्मरणार्थ दोन शिष्यवृत्ती व कै. यमुनाबाई कृष्णाजी सुपेकर यांच्या स्मरणार्थ एक शिष्यवृत्ती अशा एकूण पाच गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये एकूण २५ हजार रुपये शिष्यवृत्तींचे वाटप केले.तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य संजय जोरले यांनी मार्गदर्शन केले.आमदार हेमंत रासने यांनी आपल्या मनोगतात समाजातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे.विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे उद्याच्या उज्वल भाविष्याची पायाभरणी,तर समाज सेवकांचा गौरव म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आणि पुढील वाटचालीस प्रेरणादायी दीपस्तंभ आहे,असे गौरवोद्गार काढले.त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे बचत गटामार्फत मिळणारे लोन व प्रधानमंत्री ,मुख्यमंत्री ओबीसी महामंडळाच्या असणाऱ्या योजनासंदर्भात माहिती दिली तसेच समाजातील बांधवाना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मदत केली जाईल असे आश्वासन दिले.* *अध्यक्षीय भाषणात सुभाषजी तेटवार यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.*
*यावेळी समाजभूषण,महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश दादा पाषाणकर,श्रीराज दत्तात्रय भरणे , महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक मोहनराव जगदाळे,विकास संस्थेचे अध्यक्ष शामशेठ राजे , नगरसेवक सचिन पाषाणकर,नगरसेवक सचिन कुंभार देहुकर ,राष्ट्रीय मातीकला विकास सेलचे अध्यक्ष दत्तात्रय डाळजकर,लिज्जत पापडचे डायरेक्टर सुरेश कोते,डॉ.मिलिंद भोई , मावळ सभापती सुवर्णाताई कुंभार, मा.नगरसेविका शशिकलाताई कुंभार, मा.नगरसेविका सुरेखाताई पाषाणकर,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त रोहिणीताई पवार ,कैलास बाळासाहेब मांडेकर,अशोक रामराव पलांडे ,एन.सी.एल.चे शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मोघे,डॉ.जयंत गाडगीळ,डॉ.मोहन डोंगरे,डॉ.शुभांगी उंबरकर,महिला अध्यक्षा कल्पनाताई शिंदे, युवक अध्यक्ष रविंद्र कुंभार, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,सरचिटणीस परसराम झोजे,पुणे जिल्हा मूर्तीकला संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चांदेकर , सर्व तालुका अध्यक्ष , जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी,महिला व युवा आघाडी पदाधिकारी, सर्व माजी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . दुपारच्या सत्रात वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला.यांमध्ये जवळपास ११० वधू-वरांनी नोंदणी केली होती.वधू- वर व त्यांच्या पालकांना ज्योतिषाचार्य चिवटे शास्त्री व डाॕ.मनिषा खैरे यांनी मार्गदर्शन केले.वधू-वरांनी मंचावर येऊन ओळख करुन दिली.त्याचे सूत्र संचालन महिला आघाडी कार्याध्यक्षा श्रद्धा शिंदे यांनी केले.या स्नेहमेळाव्यासाठी भाऊसाहेब कुंभार धायरीकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.सर्व कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा ,युवा व महिला आघाडी पदाधिका-यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र जगदाळे व आभार उपाध्यक्ष नितीन कुंभार यांनी मानले.*

