४७ कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग, ३३ कंत्राटी कर्मचारी 'फिक्स-पे'वर; १२९ जणांना ग्रॅज्युटी लागू
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीच्या कायम कर्मचाऱ्यांना कामगार दिनानिमित्त मोठा दिलासा देण्यात आला आहे. २५ वर्षे सेवा झालेल्या ४७ कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे बेसिक लागू करण्यात आले असून, सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये मेडिकल अलावंस मंजूर करण्यात आला आहे. तसेच, किमान वेतन धारकांना ५००/- रुपये अंतरिम वाढ देण्यात आली असून, या कर्मचाऱ्यांना संस्थेतर्फे कर्ज वाटपही चालू करण्यात आले आहे.
याचबरोबर संस्थेतील ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फिक्स-पे वेतनावर सामावून घेण्यात आले आहे. संस्थेने सभासदांप्रमाणेच कर्मचाऱ्यांचाही १० लाख रुपयांचा नैसर्गिक विमा उतरविला असून, संस्थेचे दिवंगत कर्मचारी कै. श्रीमंत गोविंद पाटील यांच्या वारसांना १० लाख रुपयांची नैसर्गिक विमा रक्कम अदा करण्यात आली आहे. संस्थेच्या सेवानियम आणि अनुकंपा नियमाप्रमाणे कै. श्रीमंत गोविंद पाटील यांचे वारस श्रीमती शितल श्रीमंत पाटील यांना फिक्स-पे वेतनावर संस्थेच्या सेवेत समाविष्ट करण्यात आले.
संस्थेच्या सर्व १२९ कायम कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे ग्रॅज्युटी लागू करण्यात आली आहे. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा शॉल व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. विठ्ठल तुकाराम पवार पा., व्हा. चेअरमन श्री. पोपटराव भास्करराव कोते पा., संचालक श्री. महादू बापू कांदळकर, श्री. कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., श्री. संभाजी शिवाजी तुरकणे पा., श्री. देविदास विश्वनाथ जगताप, श्री. विनोद गोवर्धन कोते पा., श्री. मिलिंद यशवंत दुनबळे, श्री. तुळशीराम रावसाहेब पवार पा., श्री. रवींद्र बाबू गायकवाड, श्री. भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., श्री. इक्बाल फकीरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., श्री. रंभाजी काशिनाथ गागरे आणि तज्ञ संचालक श्री. भाऊसाहेब भानुदास लबडे पा. उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. विलास गोरखनाथ वाणी पा., सह-सचिव श्री. बाबासाहेब शंकरराव अनर्थे पा. आणि सहाय्यक सह-सचिव श्री. संभाजी सोपानराव कोते पा. यांच्यासह संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

