shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिव साई मित्र मंडळाचा १८ वा साई पालखी सोहळा व भंडारा उत्साहात संपन्न

डोंबिवली प्रतिनिधी:-
दि. २७ एप्रिल २०२६ — शिव साई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा पालखी सोहळा व साई भंडाऱ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या वर्षी मंडळाने १८ व्या वर्षात पदार्पण करत हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे पार पाडला.

दि. २६ एप्रिल रोजी साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यात साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि "साईराम" च्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता. पालखी मार्गावर विविध ठिकाणी फुलांची उधळण व स्वागत करण्यात आले, ज्यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
दि. २७ एप्रिल रोजी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्यात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध व्यवस्थापन, स्वच्छता आणि सेवाभाव यामुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत पार पडला.

या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री स्वप्नील कांबळे, उपाध्यक्ष मनोज विरकुड, खजिनदार सुनिल भिंगार्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यकर्ते अक्षय भोईर, गोरख सहानी, विनोद तर्फे, सुबोध गावडे, जय भोईर, ऋषी नलावडे, सुनिल जाधव, भांडे, किरण देशपांडे यांच्यासह असंख्य धडाडीच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि साईभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे साई पालखी सोहळा व साई भंडारा निर्विघ्न आणि यशस्वीरीत्या पार पडला. मंडळाच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, पुढील वर्षीही याच उत्साहात सोहळा साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
००००
close