वडापुरी येथील सौ हर्षलता प्रकाश तोबरे व प्रकाश पांडुरंग तोबरे या शिक्षक उभयंत्यांचा सेवापूर्ती नागरी सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.
इंदापूर: वडापुरी (ता- इंदापूर) येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व लोकनेते प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत वडापुरी येथील सौ हर्षलता प्रकाश तोबरे व प्रकाश पांडुरंग तोबरे या शिक्षक उभयंत्यांचा सेवापूर्ती नागरी सत्कार समारंभ श्रीनाथ मित्रपरिवार, समस्त ग्रामस्थ वडापुरी व शिक्षक वृंद यांच्या वतीने (दि.२५ एप्रिल) पार पडला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, लोकनेते प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी सभा प्रदेशअध्यक्ष कालिदास माने, दत्तात्रय तोरस्कर, गफूर सय्यद यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम सत्कारमूर्ती प्रकाश तोबरे यांच्या आई पुतळाबाई पांडुरंग तोबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सेवापूर्ती शिक्षक उभयंतांनी विद्यार्थ्यांना घडवत असताना आपल्या डॉ. वैभव तोबरे, इंजिनिअर पंकज तोबरे, प्राध्यापक कोमल तोबरे या या मुलांना घडवले त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी नवनाथ कुचेकर, वडापुरी पंचायत समिती सदस्य अर्चना खबाले,
अर्बन बँकेचे माजी चेअरमन सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका प्रवक्ते संदेश देवकर , ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप तोबरे, निराभिमाचे माजी संचालक,दत्तात्रेय शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष तय्यब शेख , नायब तहसीलदार प्रमोद तोबरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी सभा उपाध्यक्ष संजय अलमले,देविदास निंबाळकर, भाटनिमगाव चे माजी सरपंच अजित खबाले, वडापुरीचे माजी सरपंच अशोक फडतरे, वडापुरीची तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे,पाणीपुरवठ्याचे उपाध्यक्ष प्रकाश मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप नेते प्रवीण माने यांनी कार्यक्रमास भेट देऊन सत्कारमूर्ती प्रकाश तोबरे व हर्षलता तोबरे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारमूर्ती प्रकाश तोबरे यांनी सत्काराला उत्तर देऊन आभार मानले.
------------------------------------------
श्रीनाथ मित्र परिवाराच्या वतीने वडापुरी गावातील गुणवंतांचा सन्मान.
दरम्यान याप्रसंगी श्रीनाथ मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्य संदर्भात प्रकाश तोबरे व सौ हर्षलता तोबरे यांचा तर वडापुरी गावातील लेखा कोषागार अधिकारी वित्त विभाग महाराष्ट्र शासन येथे नियुक्त झाल्याबद्दल निकिता नितीन भारती, पुणे पोलीस मध्ये भरती झाल्याबद्दल सागर आबासो देवकर, महाराष्ट्र केसरी कुस्ती सुवर्णपदक पटकवल्याबद्दल आकांक्षा सुरेश जाधव, अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अमृता लालासो शिर्के, महापारेषण पुणे नियुक्त झाल्याबद्दल प्रतीक्षा अनिल गायकवाड, लोकल बँक ऑफिसर बँक ऑफ बडोदा येथे नियुक्ती झाल्याबद्दल संदीप सुरेश काकडे यांचा तर जिल्हा परिषद शाळा वडापुरी येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आरोही विठ्ठल कदम हिने मंथन परीक्षेत राज्यात अकरावा क्रमांक मिळवल्याबद्दल उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक कोमल तोबरे यांनी केले तर आभार बापूसाहेब चंदनशिवे यांनी मानले. सूत्रसंचालन कालिदास आवाडे यांनी केले.
-----------------
फोटो ओळ : वडापुरी (ता- इंदापूर) येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व लोकनेते प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत वडापुरी येथील सौ हर्षलता प्रकाश तोबरे व प्रकाश पांडुरंग तोबरे या शिक्षक उभयंत्यांचा सेवापूर्ती नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.

