रामवाडी येथे साईबाबा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त किर्तन महोत्सव सांगता सोहळा संपन्न..
वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे)अहिल्या नगर तालुक्यातील रामवाडी,गुंडेगाव येथील श्री.साईबाबा मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने चार दिवसीय किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला.
या किर्तन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार यांच्या प्रवचनांचे व कीर्तनांचे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या किर्तन सोहळ्याची सांगता समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.चार दिवसीय किर्तन महोत्सव काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत किर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले.या सांगता सोहळ्यासाठी इंदुरीकर महाराज यांनी समाजप्रबोधन करताना त्यांनी कुटुंबव्यवस्थेवर विशेष भर देत.साई भक्तीचा गाभा समजावून सांगताना श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व अधोरेखित केले.माणसाने आपल्या जीवनात अहंकार,मत्सर आणि लोभ यांचा त्याग करून साधेपणाने आणि प्रामाणिकपणे वागले पाहिजे, तरच साईबाबांची कृपा प्राप्त होते.तसेच“अनुभव सिद्ध गाथा” हीच खरी जीवनाची दिशा आहे असे स्पष्ट केले.त्यांनी जीवनातील संवादाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की “वाद” आणि “विसंवाद” टाळून “संवाद” वाढवला तरच समाजात ऐक्य टिकून राहते. आजच्या काळात माणूस शिक्षण घेतो, पण समजूत आणि संयम हरवत चालला आहे, ही खंत त्यांनी व्यक्त केली. अज्ञानामुळे वाद निर्माण होतात आणि त्यातून नातेसंबंध तुटतात.चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती शेवटी दुःखातच रूपांतरित होते,त्यामुळे प्रामाणिक मेहनत आणि सत्कर्म हाच खरा मार्ग आहे. “दैवी संपत्ती” म्हणजे चांगले विचार, सेवा, नम्रता आणि भक्ती हीच खरी श्रीमंती आहे.असे त्यांनी सांगितले.
यावेळी रामवाडी साईबाबा मंदिर किर्तन सोहळा समितीच्या वतीने ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.दहीहंडी, साईबाबा आरती,साईनामाचा गजर, महाप्रसादाने कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमा दरम्यान अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके साहेब,जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती बाळासाहेब हराळ, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अभिलाष घिगे, युवा नेते दादासाहेब दरेकर,कोळगावचे सरपंच भैय्या लगड,पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर, चंद्रकांत निकम, डॉ.गजानन भापकर तसेच राजकीय, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहीले होते.
यावेळी माजी उपसरपंच सुनील भापकर,महेश भापकर,सागर भापकर,साईनाथ भापकर, दत्ता भापकर, ह.भ.प. साहेबराव भापकर, ह.भ.प. संभाजी भापकर, पोपट भापकर,सरपंच संजय कोतकर, शिवनाथ कोतकर,पोपट केरु भापकर, दत्तात्रय रतन भापकर, जयवंत भापकर, अनिल हराळ, पोलिस अंमलदार,पै. सुनील भापकर, देविदास भापकर, भाऊसाहेब भापकर, आप्पा गुरुजी, कानिफनाथ भापकर, गणेश पंधरकर, भास्कर हराळ, किरण हराळ, अक्षय भापकर, गणेश भापकर, नानासाहेब भापकर, शरद सोपान हराळ, शरद(तात्या) भापकर, अनिल पवार, प्रमोद पवार, किशोर भापकर, पत्रकार दादासाहेब आगळे, संजय भापकर यांसह रामवाडी,हराळमळा, गुंडेगाव येथील तरुणांनी परिश्रम घेतले.
"श्री.साईंचीच कृपा झाली व साईबाबांनी माझ्या हातून मंदिर जीर्णोद्धार व मुर्ती प्राणप्रतिष्ठा करून घेतली,मला साईबाबांनी स्वप्नांत दिलेले दर्शनाने माझ्या जीवनाचे सोने झाले.साईबाबा प्रति असलेली श्रद्धा आज फळाला आली आहे.श्रद्धेमुळेच मला हे शक्य झाले माझ्या पाठीशी साई जो पर्यंत आहेत तो पर्यंत मला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही हा विश्वास आहे.आज गावात साईंच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त किर्तन सेवेसाठी नामवंत किर्तनकारांची हजेरी तसेच नामवंत गायक, वादक यांनी दिलेली अप्रतिम सेवा ही माझ्या साईंच्या आशिर्वादाने संपन्न झालेली सेवा आहे.मी फक्त एक नाममात्र आहे करवून घेणारा माझा साई आहे"
महेश भापकर - साईबाबा मंदिर समिती.
" साई सोहळ्यानिमित्ताने सांगु इच्छितो आपण कशासाठी जन्माला आलो असा प्रश्न बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी पडतो. याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. तरीही माणसाचा जन्म हा फक्त जगण्यासाठी नसतो तर नवीन काहीतरी वेगळे निर्माण करण्यासाठी असतो.माणसाने निस्वार्थीपणाने जगून कोणालाही न दुखावता सर्वांनाच मदत करावी तसेच आपले अस्तित्व हे इतरांना दिलासा व आधार देणारे असावे.साईबाबांनी दिलेल्या मुल मंत्रांचा सर्वांनी आचरण केले पाहिजे... श्रद्धा सबुरी...ॐ साई नाथाय नमः यात खुप मोठी ताकद असुन आलेल्या संकटांना साईबाबा नक्कीच सामना करण्याची शक्ती देतात हे अनुभवाने सागंतो...."
सुनील भापकर - साई मंदिर, रामवाडी, गुंडेगाव

