shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्स्प्रेसच्या बातमीचा थेट परिणाम..,प्रसाद नगर शौचालय दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांचे तातडीचे आदेश


शिर्डी | प्रतिनिधी
प्रसाद नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर गैरसोयींबाबत “शौचालयांची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा २६ जानेवारी २०२६ रोजी शौचालयातील मैला कार्यालयात आणून आंदोलन करण्यात येईल” असा इशारा देणारी बातमी शिर्डी एक्स्प्रेस वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली.

या बातमीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद  प्रशासनाने तातडीने े मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून तातडीने प्रसाद नगर येथील शौचालय दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागाला दिले असून, काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळापासून त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रसाद नगर येथील शौचालये गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत होती. पाण्याचा अभाव, तुटलेली दरवाजे, अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप होता.
या पार्श्वभूमीवर शिर्डी एक्स्प्रेसने नागरिकांच्या आवाजाला वाचा फोडत समस्या ठळकपणे मांडली. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ हालचाल करत संबंधित अधिकाऱ्यांना पाहणीचे आदेश दिले आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले.
नगर परिषद अहिल्यानगर आदेशानुसार शौचालयांची संरचनात्मक दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था व नियमित देखभाल यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिर्डी एक्स्प्रेसच्या या ठोस पाठपुराव्यामुळे प्रशासन हलले असून, लोकहिताच्या प्रश्नांवर पत्रकारितेची ताकद काय असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
000
close