ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
उल्हासनगर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवा भाऊ म्हणाले, येथे गुंडाराज चालू देणार नाही येथे फक्त कायद्याचेच राज्य चालेल. मी गुंडगिरी कशी संपवितो हे महाराष्ट्राला माहित आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर काही गुन्हेगार बसले होते त्याचा मात्र मुख्यमंत्र्यांना विसर पडला.
उल्हासनगर मध्ये आधी घरभेदी म्हणून ओळख असलेल्या बोडरेची नवी ओळख पलटूराम अशी झाली आहे. कधी अपक्ष, कधी शिंदे सेना, कधी उबाठात अश्या माकडऊद्या मारणारे बोडारे सध्या भाजपात डेरेडाखल झाले आहेत. त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या ऍड. सरिता खानचंदाणी यांस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. हेच बोडारे काल मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर होते. एकीकडे अटकपूर्व जामीनसाठी धडपडणारे बोडारे खुलेआम फिरत आहेत, ते व त्यांचे संशयीत सह आरोपी उल्हास फाळके हे भाजपच्या तिकिटावर उमेदवार आहेत.
या प्रकरणी सरिता खानचंदाणीचे पती पुरुषोत्तम खानचंदाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त करीत दिनांक 9/09/2025 रोजी विनंती अर्ज केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही दिले होते. असे असताना एका वादग्रस्त पालटूरामला त्यांनी उमेदवारी दिलीच शिवाय आपल्या व्यासपीठावर बसवून भाजपा गुंडांची रक्षणकर्ती आहे हेच जगाला दाखवून दिले. याच बोडारेवर जळकुंभ वं सार्वजनिक शौचालयावर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. अश्या गुन्हेगारांना पोसून, मी गुंडगिरी कशी संपवतो हे घसा फोडून सांगणारे मुख्यमंत्री खरे कि ढोंगी ?

