पत्रकार दिनानिमित्त एरंडोलमध्ये सन्मान सोहळा;लोक प्रतिनिधीं सह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
एरंडोल | प्रतिनिधी –
पत्रकार दिनानिमित्त एरंडोल येथील आस्था महिला मंडळातर्फे शहरातील पत्रकारांचा गौरव सोहळा शारदा उपासक हॉल, गढीखालील परिसर येथे सन्मानपूर्वक पार पडला. यावेळी उपस्थित पत्रकारांना अल्पोपहार देण्यात आला तसेच पेन, फाइल फोल्डर व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर म्हणाले.
> “समाजाचा आरसा दाखवणारे पत्रकार असतात. त्यांच्या सन्मानातून लोकशाही अधिक बळकट होते.
यावेळी नवनियुक्त नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकुर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
> “एक पत्रकार म्हणजे हजारो लोकांचा आवाज. लोकप्रतिनिधी जे कार्य करतात, ते समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात.”
या कार्यक्रमात नवनियुक्त नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकुर व नवनियुक्त नगरसेवक रविंद्र चौधरी यांच्या आई शीतल चौधरी यांचा आस्था महिला मंडळ व उपस्थित पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास आरती ठाकुर, डॉ. राखी काबरा, भारती साळुंखे, शोभा साळी, नंदा शुक्ला, ज्योती वाणी, शीतल चौधरी, पल्लवी पाटील, शशिकला पांडे, प्रतीभा पाटील, तेजस्विनी पाटील, संगिता सोनवणे, सारिका चौधरी, बबिता पवार आदी महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविक आरती ठाकुर, सूत्रसंचालन नंदा शुक्ला तर आभारप्रदर्शन ज्योती वाणी यांनी केले.
.




