वडापुरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २४२ रुग्णांची तपासणी.
इंदापूर: वडापुरी (ता- इंदापूर) येथे(दि.८ जाने) मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २४२ रुग्णांनी सहभाग नोंदवला.
समर्थ युवा फाउंडेशन अध्यक्ष राजेश पांडे यांच्या सहकार्यातून वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर वडापुरी येथे संपन्न झाले.
या शिबिरात 242 रुग्णांची विविध तपासण्या तपासण्या करण्यात आल्या.
याचे उद्घाटन श्रीनाथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीनाथ सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ फरतडे, डॉ. निलेश भटनाकर, महेश बोधले, प्रेमकुमार जगताप, महेश देशमुख,काशिनाथ माने, दादासाहेब गोसावी, मंगेश माने, कल्याण पाटील, संतोष पासगे, गणेश काटकर, निलेश शेलार, ओंकार नलवडे, असमा मुलाणी, अस्मा शेख, बाळासाहेब जाधव व इतर नागरिक मेडिकल स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये स्तनांचा कॅन्सर तपासणी मॅमोग्राफी, रक्त तपासणी सीबीसी टेस्ट, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, कोलेस्टॉर, डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
या शिबिराचे आयोजक पुणे जिल्हा भाजपा माजी सचिव प्रेमकुमार जगताप यांनी केले होते.
-------------------------
फोटो ओळ: वडापुरी (ता- इंदापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संपन्न झाले.

