shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वधू-वर मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील योगदान महत्त्वाचे - रोहिनी हराळे.

समाजातील योगदानामुळे वधू-वर मेळावा यशस्वी..

वाळकी प्रतिनिधी - समाजाचा आनंद द्विगुणित करणारा एक क्षण म्हणजे लोहार समाज वधूवर मेळावा नुकताच अहिल्या नगर येथे संपन्न झाला यासाठी अखिल लोहार समाज विकास संघ,लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व योगदान देण्यात आले..या मेळाव्यासाठी अहिल्या नगर,पुणे, मुंबई,नाशिक, संभाजीनगर, नागपूर,असे राज्यभरातील समाज बांधव उपस्थित होते.मेळाव्याला आलेल्या समाज बांधवांच्या व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही संघटनांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वधू आणि वर यांचा परिचय मेळावा व समाजातील शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते गुणवंतांचा शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  

        कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष अशोक हराळे (डायरेक्टर ओबीसी  व्ही जे एन टी महाराष्ट्र राज्य) मुख्य निमंत्रक श्री दशरथ एकनाथ पोपळघट (उपनगराध्यक्ष राहुरी नगरपरिषद,) श्री सोमनाथ रंगनाथ हरेल (भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष )संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप (दादा ) ज्ञानेश्वर थोरात, स्वागत अध्यक्ष श्री हर्षल प्रल्हाद आगळे, डॉ. सत्यनारायण कोठे (पिंपळे), सुभाष कौशल सर,राजेंद्र लाड साहेब,महसूल अधिकारी,तेजश्री विठ्ठल थोरात सहा.पोलीस निरीक्षक अहिल्यानगर, प्राध्यापक सुरेश मांडवगडे,लाड सर,पुणे जिल्हाध्यक्ष भरतजी थोरात, हवेली तालुका अध्यक्ष व प्रसिद्धीप्रमुख रोहिणी ताई रोहिणी पोपट हराळे,केतन दशरथ पोपळघट नगरसेवक,निलेश बन्सी गाडेकर उद्योजक,हनुमंत चव्हाण फलटण, नवनाथ हराळे (पत्रकार चांदा), संतोष होशीनाथ पोपळघट, इंजि.किसनराव पोपळघट सर, लाड मॅडम अध्यक्ष महिला हक्क आयोग महाराष्ट्र राज्य,यांनी शैक्षणिक व्यवसायिक सामाजिक मौलिक असे मार्गदर्शन केले.दोन्ही संघटनेचे पदाधिकारी लोहर युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर प्रकाश सोनवणे सहकार्याध्यक्ष,हर्षल प्रल्हाद आगळे,संजय इघे सर व सर्व सभासद व अखिल लोहार समाज विकास संघाचे पदाधिकारी विश्वनाथ य.लोखंडे, उपाध्यक्ष मनोज भा. थोरात, खजिनदार निवृत्ती भि.पोपळघट,सचिव डॉ.मुकुंद म.लोखंडे,सदस्य विजयकुमार बन्सी जगताप,सुधाकरराव कौसे, भास्करराव पोपळघट,भरत रामदास थोरात, अध्यक्ष पुणे मनोज राम लोखंडे,प्रसिद्धीप्रमुख सौ.रोहिणी पोपटराव हराळे,सागर लोहार,शिवाजीराव कळसे, सहसचिव बाळासाहेब विघे सर, शंकर रघुनाथ चव्हाण,किसन दगडू लोखंडे, सुरेश यशवंत लोखंडे,किसन चंदर पखाले,दत्तात्रय सूर्यभान जगताप, गुलाब बबन चव्हाण, विलास पोपट लोखंडे श्री दत्तात्रय भालके,अनिलराव थोरात,जालिंदर नारायण पोपळघट,पांडुरंग अर्जुन अंकुश,पोपटराव साहेबराव हराळे,सुधीर हरिहर तसेच दौंड शिरूर जुन्नर हवेली आंबेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सर्व समाज बंधू भगिनी मिळून दोन हजाराच्या संख्येने उपस्थित होते. स्व. सोमनाथ अशोक चव्हाण स्व. गोरक्षनाथ नागनाथ हरळ स्व. भास्कर त्रिंबक शेलार यांनी स्मरणार्थ अन्नदान दिले यावेळी सर्व उपस्थिताचे आभार मानण्यात आले व पसायदारान कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता केली.
close