मोर्शी: प्रतिनिधी:-
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत अरुणोदय मोहीम राबविण्यात येत आहे . ही मोहिम माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक मोर्शी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कोरडे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पथक तयार करण्यात आले आहे.
विविध कार्यक्षेत्रामध्ये 0 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींची सिकलसेल करिता तपासणी व गरजेनुसार औषधोपचार करण्यात येणार आहे सदर मोहीम मध्ये शहरातील रहिवाशांनी सक्रिय सहभागी होऊन आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती व समुदाय यांची सिकलसेल समुपदेशन,तपासणी व उपचार यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ,नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी हजर होते.

