shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“ग्रामीण आरोग्यव्यवस्थेचा थेट अनुभव : शास्त्री फार्मसीचे विद्यार्थी मैदानात”

“ग्रामीण आरोग्यव्यवस्थेचा थेट अनुभव : शास्त्री फार्मसीचे विद्यार्थी मैदानात”

रुग्णालय, होलसेल औषध पुरवठा व पथोलॉजी लॅब — एरंडोलमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची त्रिसूत्री अभ्यासभेट.
“ग्रामीण आरोग्यव्यवस्थेचा थेट अनुभव : शास्त्री फार्मसीचे विद्यार्थी मैदानात”

एरंडोल | प्रतिनिधी 

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ येथील बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दि. १४ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, औषध होलसेल वितरक आणि पथोलॉजी लॅब येथे शैक्षणिक अभ्यासभेट दिली.ग्रामीण रुग्णालयात डॉ. दीपक जाधव यांनी ओपीडी, आयपीडी, औषध वितरण व शस्त्रक्रिया विभागांची कार्यपद्धती समजावून दिली. रुग्णांना औषधे कशा प्रकारे मिळतात आणि रुग्णसेवा कशी दिली जाते याची थेट माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

“ग्रामीण आरोग्यव्यवस्थेचा थेट अनुभव : शास्त्री फार्मसीचे विद्यार्थी मैदानात”

“फार्मसी शिक्षण हे केवळ पुस्तकी नसून रुग्णसेवा आणि औषध व्यवस्थापनाशी थेट जोडलेले आहे.”— डॉ. विजय शास्त्री, प्राचार्य

डॉ. मुकेश चौधरी यांनी संसर्गजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन केले.औषध वितरण साखळीबाबत राजमुद्रा होलसेल मेडिसिनचे संचालक श्री. सतीश पाटील यांनी कंपनी-निहाय मांडणी, मार्जिन प्रणाली व पुरवठा व्यवस्थापन याची सविस्तर माहिती दिली.ह्युमन केअर डायग्नोस्टिकचे डॉ. रोहित ठाकूर यांनी रक्त, लघवी व पथोलॉजी अहवालांचे रोगनिदानातील महत्त्व स्पष्ट केले.नितीशा मेडिकलचे श्री. हितेश कापडणे यांनी रिटेल फार्मसी व्यवसायाचे व्यावहारिक पैलू मांडले.

ही अभ्यासभेट संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डॉ. पराग कुलकर्णी व प्रा. जावेद शेख यांनी आयोजनात पुढाकार घेतला, तर प्रा. करण पावरा, प्रा. गायत्री सूर्यवंशी व प्रा. योगेश्वरी लोहार यांनी यशस्वी अंमलबजावणी केली.

close