नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांचे बच्चू कडू यांचे कडून अभिनंदन.!
देवळाली प्रवरा - ०६ जानेवारी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी आज देवळाली प्रवरा येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी ढूस परिवाराचे वतीने आप्पासाहेब ढूस, पत्नी नंदा ढूस, मुलगा प्रसाद ढूस यांनी ढूस परिवाराचे वतीने बच्चू कडू यांचे शाल व वृक्ष भेट देऊन स्वागत केले.
आप्पासाहेब ढूस यांच्या सुनबाई पल्लवी वैभव ढूस या देवळाली प्रवरा नगरपालिकेत भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल बच्चू कडू यांनी नगरसेविका पल्लवी ढूस यांचे शाल व बुके देऊन बच्चू कडू यांनी अभिनंदन केले.!
प्रसंगी देवा ओमप्रकाश कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे संपर्कप्रमुख विनोदसिंग परदेशी, बाळासाहेब खर्जुले, संदीप पाखरे, सचिन साबळे, अमोल जोगदंड, उद्धव चव्हाण शहरप्रमुख विशाल शिरसाट, विधी ज्ञकिरण दहातोंडे, शेखर गोर्डे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या सौभाग्यवती नंदा ढूस, चिरंजीव प्रसाद ढूस, सुनबाई नगरसेविका पल्लवी वैभव ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख चंद्रकांत कराळे, सदस्य किरण पंडित, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, महिला शहरप्रमुख भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे, शहर संपर्कप्रमुख गणेश भालके, शहर संघटक सुनील कदम, प्रभाकर कांबळे, हर्ष कांबळे आदी उपस्थित होते..

